‘जीएसटी’ संकलन अपेक्षेपेक्षा अधिक sakal media
देश

‘जीएसटी’ संकलन अपेक्षेपेक्षा अधिक

डॉ. भागवत कराड यांची माहिती; राष्ट्रीय कर परिषदेत करदात्यांचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशात अपेक्षित एक लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) तुलनेत सध्या १.३० लाख कोटींचे जीएसटी संकलन होत आहे. प्रामाणिक करदाता, सरकार आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. आर्थिक समावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

अमनोरा फर्न क्लब येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्रेडाई’ चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेवटच्या माणसापर्यंत योजना पोचावी, याचा प्रयत्न करीत आहे. विकासाच्या योजना राबविण्यात कर हा घटक महत्त्वाचा आहे. कर प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी कर सल्लागारांनी सूचना पाठवाव्यात. अर्थ मंत्रालयाकडून कर प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामाणिक करदाता हा अर्थव्यवस्थेचा कणा, तर कर सल्लागार हा सरकार आणि करदाता यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. डिजिटल अर्थव्यवहारात वाढ झाली, तर प्रामाणिकता आणखी वाढेल.’’

सतीश मगर म्हणाले, ‘‘कर प्रणालीत मोठे बदल होत आहेत. पण कर भरताना काही अडचणी येतात. जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला, तसेच ग्राहकांनाही फटका बसला आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. या प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यवसाय नीटपणे करता यावा, यासाठी अर्थ मंत्रालयाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.’’ श्रीनिवासा राव यांनीही मनोगत व्यक्त केले. वृंदावन शहा व जयरामन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT