guardian poured hot water on 7 years old girl in andhra pradesh Sakal
देश

वडिलांचा मृत्यू, आई विदेशात; काळजीवाहू पालकांनी चिमुकलीवर ओतलं गरम पाणी

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : काळजीवाहू पालकांनी ७ वर्षीय चिमुकलीवर गरम पाणी टाकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये चिमुकली गंभीर भाजली असून घरकाम करत नसल्यानं त्यांनी हे कृत्य केलं आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील जांगरेड्डीगुडेम येथे ही घटना घडली आहे.

मिदुला असे या ७ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. तिच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिची आई दुर्गा ही कुवेतमध्ये राहते. त्यामुळे तिने आपल्या मुलीला मैत्रिण यनामदला लक्ष्मी हिच्याकडे सोडले. ते तिचे काळजीवाहू पालक होते. पण, लक्ष्मी ही मुलीवर अत्याचार करत होती. ती तिला घरगुती कामे सांगायची. कामे केली नाहीतर तिला मारहाण करायची. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीने मिदुलाला काम सांगितलं. पण, तिनं केलं नाही. त्यामुळे तिच्या अंगावर गरम पाणी ओतले. त्यामुळे ती गंभीर भाजली गेली. शेजाऱ्यांनी घटनेची तक्रार पोलिसांत दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर लक्ष्मीवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी लक्ष्मीची कसून चौकशी केली असता मुलगी घरात चोरी करायची. त्यामुळे तिला मारहाण केल्याचा दावा तिने केला असल्याचे स्टेश हाऊस ऑफिसर बाला सुरेश यांनी ANI सोबत बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT