Gujarat a few strongmen cheated government officials for over a year by setting up a fake toll plaza by bypassing the highway on private land 
देश

गुजरातमध्ये दीड वर्षांपासून सुरु होता फेक टोल नाका; आतापर्यंत वसूल केले लाखो रुपये

गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटा टोल नाका उभारुन अनेक प्रवाशांची गेल्या दीड वर्षांपासून फसवणूक करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटा टोल नाका उभारुन अनेक प्रवाशांची गेल्या दीड वर्षांपासून फसवणूक करण्यात आली आहे. बामनबोरे-कच्छ हायवेच्या बायपास रोडवर काही स्थानिक शक्तीशाली लोकांनी टोल नाका उभारला होता. यातून ते प्रवाशांकडून पैसे वसूल करायचे. (Gujarat a few strongmen cheated government officials for over a year by setting up a fake toll plaza by bypassing the highway on private land )

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मोरबी खासगी जागेवर हायवेच्या बायपास रोडवर टोल नाका उभारण्यात आला होता. प्रवाशांकडून नियमित टोलपेक्षा अर्धा टोल आकारला जात होता. अशा प्रकारे त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रवाशी आणि जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना फसवलं आहे.

अधिकृत वाघसिया टोल नाक्याच्या मॅनेजरने सांगितले की, स्थानिक जमीन मालक गेल्या दीड वर्षांपासून उघडपणे लाखो रुपये उकळत आहेत. आरोपी वाहतूक दुसऱ्या मार्गावरुन वळवत होते. आणि रागघसिया गावात टोल उभारुन प्रवासांकडून पैसे वसूल केले जात होते. ही जमीन व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीच्या मालकीची असल्याचं सांगितलं जातंय. विशेषत: ट्रक चालकांना दुसऱ्या मार्गावर नेऊन त्यांच्याकडून अधिकृत टोल नाक्यावर असलेल्या दरांपेक्षा अर्धा टोल आकारला जात होता.

गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. त्याकडे कोणाचं लक्ष न गेल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मोरबी जिल्हाधिकारी जीटी पांड्या म्हणाले की, काही वाहने दुसऱ्या मार्गाने वळवले जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. तसेच प्रवाशांकडून टोल वसूल केला जात होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल करण्यात आलीये.

पोलिसांनी व्हाईट हाऊस सिरॅंमिक कंपनीचा मालक अमरषी पटेल, वनराज सिंग झाला, हरविजय सिंग झाला, धर्मेंद्रा सिंग झाला, युवराज सिंग झाला आणि अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, स्थानिक शक्तिशाली लोक ट्रक चालकांना टोल देण्यासाठी बळजबरी करत होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT