Sabarkantha Accident ESakal
देश

Sabarkantha Accident: भयंकर! 120 किमीचा वेग; काही सेकंदातच 7 जणांचा बळी, भीषण अपघाताचा Live व्हिडिओ समोर

Sabarkantha Accident: गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Vrushal Karmarkar

कोणत्या तरुणाला आपल्या मित्रांसोबत मजेत सहलीला जाणे आणि खूप मजा करायला आवडत नाही, पण मौजमजेच्या नावाखाली तुम्ही ताशी 120 किलोमीटर वेगाने गाडी चालवता आणि पुढच्या काही मिनिटांत तुम्ही अशा अपघाताचा बळी व्हाल, ज्यात तुमचा जीव जाऊ शकतो. गुजरातमधील साबरकांडा येथे बुधवारी झालेला रस्ता अपघातही वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झाले आहे.

या व्हिडिओमध्ये, कारमधील सर्व लोक कसे मस्ती करत आहेत आणि मोठ्या आवाजात गाणे ऐकत आहेत, हे दिसत आहे. आणि त्यादरम्यान त्यांची कार हायवेवर 120 च्या वेगाने जात आहे, हा कारमधील सर्व लोकांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे सिद्ध झाले. या अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेपूर्वी भारत केसवानी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केला होता. पुढे या अपघातात भरत केसवानी यांचाही मृत्यू झाला.

या व्हिडीओमध्ये कारच्या आत बसलेले सर्व लोक गाडीच्या वेगाचा आनंद घेत नाचताना आणि गाताना दिसत आहेत. कारमधील सर्व लोक परदेशातून आलेल्या त्यांच्या मित्रासोबत राजस्थानला फिरायला जात होते, असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान त्यांची गाडी हिम्मतनगरजवळ आली असता मोठा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिम्मतनगर येथे हा अपघात झाला. अग्निशमन दलाने कार कापून मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT