Gujarat Assembly Election 
देश

Gujarat Assembly Election : पहिल्या टप्प्यासाठी हजारपेक्षा जास्त अर्ज

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार ३६२ उमेदवारांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार ३६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती मंगळवारी दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे नेते भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील घातलोडिया मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसूदान गढवी हे द्वारका जिल्ह्यातील खंबालियातून निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. अर्ज स्वीकृतीचा सोमवारी (ता.१४) शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत (ता.१७) आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी ९५ अर्ज

राज्यातील कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोटाड, नर्मदा, भरूच, सुर अशा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बनासकांठा, पाटण, मेहसाना, साबरकांठा, गांधीनगर, अरवली, अहमदाबाद आदी जिल्ह्यात निवडणूक होणार असून आतापर्यंत ९५ उमेदवारांनी अर्ज भरले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे.

पहिला टप्प्यासाठी निवडणूक

८९ - एकूण जागा

१ डिसेंबर - मतदानाची तारीख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT