Gujarat Election sakal
देश

Gujarat Election: मोदींच्या गुजरातमध्ये १८ गावातील लोकांचा निवडणुकीवर बहिष्कार; कारण...

नेत्यांना गावात येण्यास आणि प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी तयारी केली आहे. मात्र नवसारी विधानसभेतील 18 गावांतील लोकांनी सर्वच पक्षांची चिंता वाढवली आहे. या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांना गावात येण्यास आणि प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

अंचेली रेल्वे स्थानकावर लोकल गाड्या थांबत नाहीत. रेल्वे स्थानकावर गाड्या थांबाव्यात अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. अंचेली रेल्वे स्थानक व इतर स्थानकांवर ग्रामस्थांच्या वतीने बॅनरही लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवर 'नो ट्रेन, नो व्होट' असे लिहिले आहे.

रेल्वे स्थानकावर गाडी न थांबल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान 300 रुपये खर्च करावे लागतात. गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अनेकदा त्यांना कॉलेजला जायला उशीर होतो.

ग्रामस्थांच्या मते, 1966 पासून अंचेली रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत आहेत. पूर्वी पॅसेंजर ट्रेन येथे थांबत असत, नंतर त्यांची संख्या वाढली. मात्र, कोरोना महामारीच्या काळात या स्थानकावर गाड्या थांबत होत्या. मात्र आता कोरोना संपला असतानाही येथे गाड्या थांबत नाहीत. येथे गाडी थांबली नाही तर मतदानाच्या दिवशी कोणीही मतदानाला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT