Gujarat Election Result esakal
देश

Gujarat Election Result: गुजरातच्या या २२ जागांकडे देशाचं लक्ष

संतोष कानडे

Gujarat Assembly Election Result 2022

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. १८२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मंगळवारी शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान झालं. एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

गुजरातमध्ये २२ जागा अशा आहेत ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख चेहरे आहेत.

१. भूपेंद्र पटेल- भाजप

२. हार्दिक पटेल- भाजप

३. अल्पेश ठाकोर- भाजप

४. रिवाबा जडेजा- भाजप

५. हर्ष सांघवी- भाजप

६. जीतूभाई वाघानी- भाजप

७. पायल कुररामी- भाजप

८. कांतीलाल अमृतिया- भाजप

९. दर्शिता- भाजप

१०. पुरुषोत्तम सोळंकी- भाजप

११. बाबू बोखरिया- भाजप

१२. सुखराम राठवा- काँग्रेस

१३. अर्जून मढवाडिया- काँग्रेस

१४. जिग्नेश मेवाणी- काँग्रेस

१५. सत्यजित गायकवाड- काँग्रेस

१६. परेश धनानी- काँग्रेस

१७. वीरजी थुम्मर- काँग्रेस

१८. इमरान खेडावाला- काँग्रेस

१९. इसुदान गढवी- आप

२०. गोपाल इटालिया- आप

२१. अल्पेश कथीरिया- आप

२२. महेश वसावा- बीटीपी

2017 मध्ये अशी होती परिस्थिती...

  • २०१७मधील निवडणुकीत मध्य गुजरातच्या ६८ पैकी ४० जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा २४ जागांवर विजय झाला होता. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यात ४ जागा पडल्या होत्या.

  • कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे होता. ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेस तर २३ जागांवर भाजपने विजय मिळवलेला. तर एक आमदार अपक्ष म्हणून निवडून आलेला होता.

  • उत्तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमधली रणधुमाळी भलतीच गाजली. येथील ३२ पैकी १७ विधानसभेच्या जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. तर १४ जागा भाजपच्या खात्यात पडल्या. एका जागेवर काँग्रेस पुरस्कृत जिग्नेश मेवाणी विजयी झाले होते.

  • दक्षिण गुजरातमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता. या भागातल्या २८ मतदारसंघांपैकी २२ जागांवर भाजपने वर्चस्व सिद्ध केलं. उर्वरित ६ जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT