Gujarat Election 
देश

Gujarat Election : पटेलांविरोधात आमी याग्निक मैदानामध्ये

काँग्रेसची ४३ उमेदवारांची पहिली यादी; मोधवाडिया पोरबंदर येथून

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घातलोडियामधून राज्यसभेच्या खासदार आमी याग्निक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया हे पोरबंदर येथून निवडणूक लढतील. त्यांना याआधी २०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप नेते बाबू बोखीरिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

या पहिल्या उमेदवार यादीमध्ये याग्निक यांच्यासह सात महिला नेत्यांचा समावेश असून काही माजी आमदारांना देखील यावेळी उमेदवारी मिळाली आहे.

ज्येष्ठ नेते नरेंद्र रावत यांच्या पत्नी आमी रावत यांना सयाजीगंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जसदान येथून पुन्हा भोलाभाई गोहेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावनगरच्या महुआ जागेवर कानुभाई कलासारिया यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे भाजपला धक्का बसला असून माजी मंत्री जयनारायण व्यास यांनी वैयक्तिक कारण पुढे करत पक्षाला सोडचिठ्ठी देऊ केली आहे. व्यास हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरबाबत नवी मागणी समोर; बेसिक सॅलरीत होणार मोठी वाढ?

Satara: कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचं उद्घान लांबणीवर, प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार; NHAIने कंत्राटदाराला दिले नवे आदेश

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

‘सासूसोबत पत्रिका जुळली तरच लग्न!’ सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा जपणारी 'कपबशी'ची अनोखी कथा

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

SCROLL FOR NEXT