Gujarat Assembly elections Congress 
देश

काँग्रेसकडून विभागनिहाय निरीक्षक नियुक्त

मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या जवळपास चाळीसहून अधिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यासाठी उत्तर, दक्षिण, सौराष्ट्र आणि मध्य अशा चार विभागांत विभागणी करण्यात आली असून मुख्यालयासह या विभागांची जबाबदारी मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्याचप्रमाणे बी. के. हरिप्रसाद आणि माजी मंत्री के. एच. मुनियप्पा या नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, चारही विभागांमध्ये येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांसाठी देखील स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये मुकुल वासनिक यांच्याकडे उत्तर गुजरातची, मोहन प्रकाश यांच्याकडे सौराष्ट्र विभागाची, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्य गुजरातची तर बीके हरिप्रसाद यांच्याकडे पक्ष मुख्यालय असलेल्या उत्तर गुजरातची जबाबदारी देण्यात आली.

माजी मंत्री मुनियप्पा हे हरिप्रसाद यांना मदत करतील. हे सर्व नेते गुजरात निवडणुकीची विशेष जबाबदारी सांभाळणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपर्कात राहतील. त्याचप्रमाणे २६ लोकसभा मतदारसंघांसाठी ३२ निरीक्षकांनाही नेमण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT