Gujrat ATS ANI
देश

गुजरात : 400 कोटींचे हेरॉइन जप्त; पाकिस्तानी बोटीसह 6 जण ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या जल हद्दीत ६ चालकांसह पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. अल हुसैनी ही पाकिस्तानी नाव पथकाने ताब्यात घेतली.

गांधीनगर - गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. भारताच्या जल हद्दीत ६ चालकांसह पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. अल हुसैनी (Al Al Huseini) ही पाकिस्तानी (Pakistan) नाव पथकाने ताब्यात घेतली. अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ एक पाकिस्तानी नाव दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन (Heroin) जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनच्या तस्करीत होते.

याआधी सप्टेंबरमध्ये भारतीय तटरक्षक दलाने गस्त घालत असताना १२ जणांसह पाकिस्तानी बोट पकडली होती. ती नाव गुजरात किनारपट्टीपासून दूर अंतरावर होती. खराब हवामान असतानाही तेव्हा भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी नाव पकडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT