Gujrat Drugs Sakal
देश

गुजरात: अदानी समुहाच्या बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉईन

याच बंदरावरुन गेल्या वर्षी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

गुजरात पोलिसांनी कच्छमध्ये असलेल्या मुंद्रा बंदराजवळून ३७६ कोटी ५० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या बंदराजवळ असलेल्या कंटनेरमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने ही कारवाई करण्यात आली. (Gujrat Drugs News)

हा सर्व माल १३ मे रोजीच या बंदरात दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. संयुक्त अरब अमिरातीतून हा माल इथं आल्याचंही समजतंय. या कंटेनरमधले अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे तुकडे वापरण्यात आले होते. तसंच त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिकही लावण्यात आलं होतं. हा माल पंजाबमध्ये पाठवण्याचं नियोजन होतं.

सप्टेंबर २०२१ मध्ये याच बंदरावरुन तीन हजार किलो अमली पदार्थ सापडले होते. त्यावेळीही अदानी समूहाच्या मालकीचं हे बंद चर्चेत आलं होतं. तर यावर्षी फेब्रुवारीमध्येही एका जहाजातून २००० कोटींहून अधिक किमतीचं ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT