Gujarat BJP spent 210cr on 2022 assembly polls 
देश

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने खर्च केले 210 कोटी; काँग्रेस-आप'ने किती खर्च केला?

Sandip Kapde

Gujarat BJP spent 210cr on 2022 assembly polls

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत प्रचारावर झालेल्या खर्चाच्या बाबतीतही भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर भाजपने सुमारे 210 कोटी रुपये खर्च केले. तर काँग्रेसचा एकूण खर्च 103 कोटी रुपये होता.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजपचा खर्चाचा अहवाल गुरुवारी  प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार 209.97 कोटी रुपयांपैकी 163.77 कोटी रुपये पक्षाच्या प्रचारावर खर्च करण्यात आले. याशिवाय पक्षाने 5.15 कोटी रुपये गुन्हेगारी स्वरूपाच्या उमेदवारांची माहिती देण्यासाठी खर्च केले.

भाजपच्या केंद्रीय युनिटने अहवाल दिला होता की त्यांनी नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्या प्रचारासाठी 2.88 कोटी रुपये आणि मीडिया जाहिरातींवर 27 लाख रुपये खर्च केले. पक्षाने उमेदवारांना सुमारे 41 कोटी रुपये दिले आणि विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासह प्रवास खर्चासाठी एकूण 15 कोटी रुपये खर्च केले.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 111 कोटी रुपये खर्च केले होते. गुजरात भाजपने निवडणूक आयोगाला असेही सांगितले की 2022 चा मोठा खर्च रॅली आणि स्टार प्रचारकांच्या प्रवासावर, प्रचार सामग्रीची छपाई आणि इतर सामान्य प्रचारावर होता. राज्य भाजपने निवडणूक आयोगाला माहिती दिली की, त्यांच्याकडे 757.41 कोटी रुपयांचा निधी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व राजकीय पक्षांना उमेदवारांवरील प्रलंबित फौजदारी खटल्यांबाबत सर्व तपशील स्थानिक वर्तमानपत्रातच नव्हे तर पक्षाच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया हँडलवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

182 पैकी 17 जागा जिंकणाऱ्या आणि मोठ्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर एकूण 103.26 कोटी रुपये खर्च केल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले.

पाच जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने फेब्रुवारीमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारावर एकूण 33.8 कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT