Gujarat BJP vice president rape kidnapping offenseGujarat BJP vice president rape kidnapping offense 
देश

गुजरात भाजप उपाध्यक्षांवर बलात्कार, अपहरणाचा गुन्हा

महेश शहा

अहमदाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार जयंती भानुशाली यांच्याविरुद्ध 21 वर्षे वयाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्यांना कधीही अटक होण्याची शक्‍यता आहे. सुरत पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे. 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पीडित महिलेसह पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार हंगामा केल्यानंतर अखेर पोलिसांना भानुशाली यांच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करावी लागली. पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले, की पीडितेने भानुशाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्धही तक्रार नोंदविली आहे. त्यांच्याविरुद्ध बलात्कार, अपहरण आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त लीना पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, त्यांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला. फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने भानुशाली यांनी बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर भानुशाली यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT