Gujarat Chadasana Dalit Groom esakal
देश

मोदींच्या राज्यात चाललंय काय? वरातीत घोड्यावर बसला म्हणून दलित नवरदेवाला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

हल्लेखोरांनी वराला जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही त्याने या तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

केवळ आपल्या समुदायातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात, असे म्हणत त्यांनी दलित (Dalit Groom) वराला मारहाण केली.

गांधीनगर : लग्नसमारंभादरम्यान (Wedding Ceremony) घोड्यावर स्वार झाल्याने दलित वराला शिवीगाळ व मारहाण करण्याची धक्कादायक घटना गुजरातेतील गांधीनगर (Gujarat Gandhinagar) जिल्ह्यातील चाडसाना गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली.

संबंधित वर लग्नानिमित्त घोड्यावर (Horse) स्वार झाला होता. तेथून जवळपास १०० जणांसह तो वधूच्या गावातील घराकडे जात होता. त्यावेळी, दुचाकीवरून आलेल्या एकाने घोडा थांबवून त्याला खाली उतरवून थप्पड मारली, अशी तक्रार त्याच्या भावाने केली आहे.

यावेळी हल्लेखोरांनी वराला जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही त्याने या तक्रारीत म्हटले आहे. केवळ आपल्या समुदायातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात, असे म्हणत त्यांनी दलित (Dalit Groom) वराला मारहाण केली. या ठिकाणी नंतर आणखी तीन जण आले. चौघांनी वराला शिवीगाळ करत धमकी दिली, असा उल्लेखही ‘एफआयआर’ मध्ये करण्यात आला आहे.

या घटनेनंतर वराने घोड्याऐवजी मोटारीतून वधूचे घर गाठले. शैलेश ठाकोर, जयेश ठाकोर, समीर ठाकोर आणि अश्विन ठाकोर अशी या चौघा आरोपींची नावे असून ते सर्व ओबीसी समुदायातील आहेत. त्यांच्याविरुद्ध ॲट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT