देश

Gujarat CM: उद्या दोन वाजून वीस मिनिटांनी होणार शपथविधी

सकाळ डिजिटल टीम

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि मोठा राजकीय भुकंप झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे. या बैठकीपुर्वीच उपमुख्यमंत्री नितीन पाटील यांनी गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा असावा असे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? की नवीन तिसऱ्यालाच संधी मिळणार हे आता पाहावे लागणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स वाचा फक्त 'सकाळ'वर...

उद्या २ वाजून वीस मिनिटांनी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली आहे.

भुपेंद्र पटेल यांनी नुकतीच राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

  • गुजरातच्या मुख्यमंत्री पदी नव्याने निवड झालेले भुपेंद्र पटेल यांचा शपथविधी उद्या होणार आहे. त्यांच्यासोबत इतर कुणाचाही शपथविधी होणार नाहीये. याबाबतची माहिती राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

  • भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली, तो क्षण!

  • गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आल्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

भुपेंद्र पटेल हे आमदार आहेत मात्र, त्यांच्या नावाबद्दलचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीये. बैठकीत काय निर्णय होतोय, ते पाहण्यासाठी आम्ही थोडी वाट पाहू.

- यमल व्यास, प्रमुख प्रवक्ते, गुजरात भाजप

  • भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री; थोड्याचवेळात होणार अधिकृत घोषणा

  • उपमुख्यमंत्री नितीन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीपुर्वीच सुचक वक्तव्य केलं, गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेला असावा अस विधान त्यांवी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदा बाबात त्यांचं नाव असल्याच्या चर्चेवर उत्तर देताना ते म्हणाले की, या बद्दलचा सर्व निर्णय हायकमांड घेईल.

  • गुजरातचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी सध्या भाजपच्या सर्व आमदारांची बैठक गांधीनगर येथे सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT