देश

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी तिचे डोळे आणि बॉडी डोनेट केली आहे. ''हीरला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आम्ही तिचं शरीर डोनेट केलं असून त्यामुळे इतरांचे प्राण वाचू शकतील'', असं तिच्या पालकांनी सांगितलं.

संतोष कानडे

नवी दिल्लीः गुजरातच्या मोरबी येथील एका सोळा वर्षीय विद्यार्थीनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थीनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९९ टक्के गुण घेऊन टॉपर ठरली होती.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, गुजरातने ११ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला होता. या परीक्षेत हीर घेटिया या विद्यार्थीनीने ९९.७० टक्के गुण मिळवले होते.

सदरील विद्यार्थीनीवर महिन्याभरापूर्वी ब्रेन हॅमरेजमुळे राजकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली आणि तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागच्या आठवड्या तिला अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला, शिवाय छातीत त्रास झाला. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु झाले आणि एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला. त्यात तिच्या मेंदूने ८० ते ९० टक्के काम करणं बंद केल्याचं निदर्शनास आलं. त्यातच बुधावरी हीरचा मृत्यू झाला.

विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी तिचे डोळे आणि बॉडी डोनेट केली आहे. ''हीरला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आम्ही तिचं शरीर डोनेट केलं असून त्यामुळे इतरांचे प्राण वाचू शकतील'', असं तिच्या पालकांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT