Sanjeev Bhatt 
देश

Sanjeev Bhatt: माजी IPS अधिकारी संजीव भट्ट 28 वर्षांनंतर दोषी! काय आहे प्रकरण जाणून घ्या

गोध्रा दंगल प्रकरणामुळं चर्चेत आलेले संजीव भट्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा दंगल प्रकरणात गुन्हा दाखल झालेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका जुन्या २८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात त्यांना आज कोर्टानं दोषी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निकालामुळं भट्ट हे चर्चेत आले आहेत. (Gujrat Ex IPS officer Sanjeev Bhatt convicted after 28 years in NDPS case)

काय आहे प्रकरण?

पालनपूर इथं सन १९९६ मध्ये अंमली पदार्थ्यांशी संबंधित NDPS कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना या प्रकरणी बुधवारी, २७ मार्च रोजी पालनपूर सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. याठिकाणी कोर्टानं त्यांना दोषी जाहीर केलं. (Latest Marathi News)

गोध्रा हत्याकांडाशी काय आहे संबंध?

गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीवेळी बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तत्कालीन आपीएस अधिकारी असलेले संजीव भट्ट यांना तपास यंत्रणेनं कारवाई केली होती. त्याचबरोबर याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते.

या तिघांनी खोटी शपथपत्रे तयार करुन तत्कालीन गुजरामधील नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचं कट-कारस्थान रचल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT