Vijay Rupani, Nitin Patel 
देश

मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह ८ मंत्र्यांचा निवडणूक लढविण्यास नकार

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी नितीन पटेल यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी दावा केला होता. पण आता स्वत:च माघार घेतली आहे. नितीन पटेल यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान निवडणुकीत यावेळी नव्या चेहऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायला हवी, असं मत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले आहे. आपण दिल्लीला पत्र पाठवून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. शिवाय केंद्रीय निवडणूक समितीने दिलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा प्रयत्न करेल, असंही रुपाणी यांनी म्हटलं.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याव्यतिरिक्त माजी गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा, सौरभ पटेल, विभावरी बेन, कौशिक पटेल, वल्लभ काकडिया आणि योगेश पटेल यांनीही निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भूपेंद्र चुडासामा यांनीही निवडणूक न लढवण्याचे सुतोवाच केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारमधील बहुतांश मंत्र्यांना तिकीट न मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT