gujarat government likely to constitute a committee for uniform civil code gujrat politics esakal
देश

Uniform Civil Code: गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी! घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Uniform Civil Code: गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसता आहे. दरम्यान या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. गुजरात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी आता एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, गुजरातमध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्यासाठी समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील आणि त्यात तीन ते चार सदस्य असतील.

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारनेही समान नागरी संहिता लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकार संसदेला समान नागरी संहितेबाबत कोणताही कायदा बनवण्याचे किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. वारसाहक्क, वारसा, दत्तक घेणे, विवाह, घटस्फोट, पालनपोषण आणि देखभाल भत्ता यांचे नियमन करणाऱ्या वैयक्तिक कायद्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

INDW vs PAKW: भारताने केलेलं रनआऊट योग्यच! पाकिस्तानला क्रिकेटचा नियम सांगत MCC ने दाखवला आरसा

18 वर्षानंतर 'दामिनी' प्रेक्षकांच्या भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला, निर्भिड पत्रकार पुन्हा समोर, सुबोध भावेची महत्त्वाची भूमिका

Manikrao Kokate : मला रम्मी खेळता येत नाही!”; मंत्री कोकाटे यांचा न्यायालयात दावा

माेठी बातमी! 'डीजेमुक्ती'नंतर आता 'भाेंगेमुक्त' साेलापूर; २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे, स्पीकर काढले..

SCROLL FOR NEXT