Gautam Adani esakal
देश

Adani Group : 'अदानीं'ना दिलेली 108 हेक्टर जमीन परत घेणार; गुजरात सरकारची न्यायालयात माहिती, काय आहे कारण?

गुजरात सरकारच्या (Gujarat Govt) निर्णयाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या महसूल विभागाने २००५ मध्ये ही जमीन अदानी कंपनीला दिली होती, मात्र ग्रामस्थांना त्याची माहिती २०१० मध्ये लागली.

अहमदाबाद : कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदराजवळ अदानी समूहाला (Adani Group) दिलेली सुमारे १०८ हेक्टर जमीन परत घेणार असल्याची माहिती काल गुजरात सरकारने गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) दिली. जनावरांच्या कुरणासाठी असलेली जमीन २००५ मध्ये अदानी समुहाच्या एका कंपनीला दिली होती.

नवीनल गावातील ग्रामस्थांनी अदानी पोर्टस ॲड एसईझेड लिमिटेडला (एपीएसईझेड) गावालगतची कुरणाची २३१ एकर जमीन देण्याच्या गुजरात सरकारच्या (Gujarat Govt) निर्णयाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. राज्याच्या महसूल विभागाने २००५ मध्ये ही जमीन अदानी कंपनीला दिली होती, मात्र ग्रामस्थांना त्याची माहिती २०१० मध्ये लागली.

‘एपीएसईझेड’ने या कुरणाच्या जमिनीवर कुंपण घालण्यास सुरवात केली, तेव्हा ग्रामस्थांना ही जमीन अदानी समुहाला दिल्याचा शोध लागला. त्यामुळे त्यांनी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने कुरणासाठी ३८७ हेक्टर अतिरिक्त सरकारी जमीन उपलब्ध करून देण्याची हमी देत तसे आदेश उपायुक्तांनी काढले. मात्र तशा कोणत्याच हालचाली न झाल्याने ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT