GUJRAT COURT 
देश

गुजरातची वाटचाल आरोग्य आणीबाणीच्या दिशेनं; हायकोर्टाचे सरकारच्या धोरणावर ताशेरे

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर - देशभरात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत स्वत: माहिती घेत जनहित याचिकेवर सुनावणी सुरु केली आहे. मुख्य न्याधीश विक्रम नाथ यांनी एका आदेशाद्वारे उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीतर्फेच जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. गुजारतमधील कोरोना संसर्गामुळे आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. राज्यात बिघडत चाललेली परिस्थिती पाहून गुजरात सरकारने अशा प्रकारे दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे. गेल्या वर्षीही अशा प्रकारची याचिका दाखल केली होती. त्यावर अजुनही सुनावणी सुरु आहे. नव्या याचिकेत गुजरात सरकार, आरोग्य विभाग आणि केंद्र सरकारला पक्षकार करण्यास सांगण्यात आलं आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने गुजरात सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं की, आम्ही सरकारच्या धोरणावर समाधानी नाही. लोक काही करू शकतील अशी काही दुरुस्ती धोरणामध्ये गरजेची आहे. येत्या गुरुवारी यावर पुन्हा सुनावणी होईल. तेव्हा सरकारने काय पावलं उचचली हे पाहणार असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. 

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि भार्गव डी करिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. ऑनलाइन पद्धतीने मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या निवासस्थानी ही सुनावणी पार पडली. 

मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं होतं की, लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, मुलभूत सुविधांची कमतरता टेलिव्हिजनवरून दिसत आहेत. रुग्णालयात बेड कमी पडतायत, रेमडेसिव्हिर उपलब्ध नाही, ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा असल्याच्या बातम्या येत असल्याचं सांगत न्यायालयाने गुजरात सरकारला झापलं. गुजरातमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत आहे. रविवारी राज्यात 24 तासांमध्ये 5 हजार 469 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 54 जणांचा मृत्यू झाला. सुरत शहरात तर कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असून 4 हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT