Senior Advocate Bhaskar Tanna seen allegedly consuming beer and talking on the phone during a virtual session of the Gujarat High Court  esakal
देश

Senior advocate drink beer in Court hearing : ''दुनिया जाए फौज मै अपन अपनी मौज मै..'' ; हायकोर्ट सुनावणीत व्यस्त, वकीलसाहेब ‘chilled beer’ पिण्यात मस्त!

Gujarat High Court’s Response to the Viral Incident - जाणून घ्या, गुजरात उच्च न्यायालयाने काय घेतली अ‍ॅक्शन घेतली आणि काय नाव आहे या वकिल महोदयांचं?

Mayur Ratnaparkhe

Bhaskar Tanna's Controversial Conduct During Virtual Hearing -गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीत व्हर्च्युअली सहभागी झालेले असतानाही, बिअर पिणारे अन् फोनवर बोलणाऱ्या एका वरिष्ठ वकिलाच्या गैरवर्तनाची स्व:हून दखल घेतली आणि संबंधित वकिलाविरोधात अवमान कारवाईही सुरू केली आहे.

न्यायमूर्ती ए.एस.सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर.टी. वच्छानी यांच्या खंडपीठाने म्हटले की, भास्कर तन्ना यांच्या वर्तनामुळे त्यांचे वरिष्ठ वकिलाची पद काढून घेतले गेले पाहिजे. उच्च न्यायालायने प्रकरणाच्या सुनावणीनंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगितले जात आहे की, ही घटना २५ जून रोजी न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या खंडपीठासमक्ष घडली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यासंदर्भात न्यायमूर्ती सुपेहिया यांनी म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हायकोर्टाच्या सुनावणीच्या व्हिडिओत दिसते आहे की, सुनावणीत सहभागी असतानाही वरिष्ठ वकील फोनवर बोलत आहेत, एवढंच नाहीतर याचसोबत ते एका मोठ्या ग्लासातून बियरचे घोटही घेत आहेत. हे वर्तन आक्षेपार्ह आहे.

तर याबाबत उच्च न्यायालयाने म्हटले की, वकील तन्ना यांच्या या गंभीर कृत्याचे दूरगामी परिणाम होतील आणि जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर ते कायद्याच्या राज्याशी विनाशकारी ठरेल. तसेच, न्यायालयाने म्हटले की, आम्ही रजिस्ट्रींना वरिष्ठ वकील भास्कर तन्ना यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमानाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देत आहोत. रजिस्ट्री पुढील सुनावणीच्या तारखेआधी एक रिपोर्ट सादर करेल. याचसोबत उच्च न्यायालयाने रजिस्ट्रीला तन्ना यांना नोटीस बजवण्याचेही निर्देश दिले आहेत आणि त्यांना खंडपीठासमोर व्हर्चुअली हजर राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT