Gujarat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict Himachal Pradesh BJP Leading
Gujarat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict Himachal Pradesh BJP Leading  
देश

दुपारी 12 वाजता: भाजपची गुजरातमध्ये सिक्सर; 'हिमाचल'मध्येही विजय

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून सत्तेवर येईल. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे. तेथेही भाजपला स्पष्ट बहुमत दिसते आहे. 

मतमोजणीनंतरच्या पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा आघाडीवर आला. सकाळी दहानंतर मात्र गुजरातमधील कल भाजपच्या दिशेने वळायला लागला. हिमाचलमध्ये भाजपकडे सुरूवातीपासून आघाडी आहे. 

कल असा

गुजरात विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 182
  • भाजपः 103
  • काँग्रेसः 76
  • अपक्ष/इतर: 3

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल/कल: 

  • एकूण जागा: 68
  • भाजपः 45
  • काँग्रेसः 20
  • अपक्ष/इतर: 2

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट होत आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. 

#GujaratVerdict | Gujarat Assembly Election Result 

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली. 

हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT