NEET exam  esakal
देश

NEET Exam : हद्दच झाली! बारावीच्या परीक्षेत नापास पण 'नीट'मध्ये 705 मार्क; नेमका प्रकार काय?

NEET Exam Results : १२वीच्या मार्कशीटनुसार सदर विद्यार्थीनीला फिजिक्समध्ये २१ मार्क मिळाले आहेत. तर केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये ३१ आणि ३९ मार्क मिळाले आहेत. याशिवाय इंग्रजीमध्ये तिला केवळ ५९ मार्क मिळाले. ७०० पैकी तिला ३५२ मार्क्स मिळाले आहेत.

संतोष कानडे

नवी दिल्लीः गुजरातमध्ये एका विद्यार्थीनीने अशी कमाल केली की, तिच्या या कारनाम्यामुळे सगळेच आवाक् झाले आहेत. नीट-युजी परीक्षेत या विद्यार्थीनीने ७२० पैकी ७०५ गुण मिळवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही विद्यार्थीनी बारावीच्या परीक्षेत चक्क नापास झाली होती.

शनिवारी नीट युजी परीक्षेचा निकाल लागला. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार ही कमाल अहमदाबाद येथील एका विद्यार्थीनीने केलीय. बारावी परीक्षेचा मार्कमोमो आणि नीट परीक्षेची निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

१२वीच्या मार्कशीटनुसार सदर विद्यार्थीनीला फिजिक्समध्ये २१ मार्क मिळाले आहेत. तर केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये ३१ आणि ३९ मार्क मिळाले आहेत. याशिवाय इंग्रजीमध्ये तिला केवळ ५९ मार्क मिळाले. ७०० पैकी तिला ३५२ मार्क्स मिळाले आहेत.

रिपोर्टनुसार, ही विद्यार्थीनी अभ्यासात अतिशय मागे पडत असल्याने शाळेने तिच्या पालकांना याबाबत अवगत केलं होतं . तिच्या कोचिंग सेंटरने सांगितलं की, १२मध्ये तिने दोनदा ड्रॉपआऊट केलेलं आहे. ११ वी आणि १२वीसाठी तिने कोचिंग सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. महाविद्यालयात ती केवळ एक डमी विद्यार्थीनी म्हणून रजिस्टर्ड होती.

यातच शनिवारी नीट युजी परीक्षेचा निकाल बघून महाविद्यालय प्रशासन गोंधळात पडलं. जी विद्यार्थीनी १२ वीमध्ये नापास झाली तिला नीट युजी परीक्षेत तब्बल ७२० मार्क कसे मिळाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला. नीट परीक्षेत फिजिक्समध्ये तिला ९९.१ टक्के गुण मिळाले आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये ९९.१ आणि बायोलॉजीमध्ये ९९.८ टक्के गुण मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT