Coronavirus Sakal
देश

गुजरातने दडवली कोरोना बळींची संख्या

कोरोना बळींची संख्या प्रत्यक्षापेक्षा सरकारी पातळीवर कमीच दाखवली जात असल्याचे आरोप होत आहेत.

वृत्तसंस्था

अहमदाबाद - कोरोना (Corona) बळींची (Death) संख्या प्रत्यक्षापेक्षा सरकारी पातळीवर कमीच दाखवली जात असल्याचे आरोप होत आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी ‘वायर’च्या टीमने गुजरातमधील (Gujrat) १७० पालिकांपैकी ६८ पालिकेतील मृत्यु नोंदवहीचा पंचनामा केला. त्यावरून मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान १६,८९२ जणांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण एकूण आकडे तपासल्यास कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २.८१ लाखांवर गेलेली असू शकते. यानुसार सरकारी आकड्याशी तुलना केल्यास ही संख्या २७ पटीने अधिक असू शकते.

गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांचे खरे आकडे जाहीर करण्याबाबत तंबी दिली होती. त्यानंतरही सरकारने २०२० पासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत राज्यात केवळ १०,०७५ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे ‘द वायर‘ च्या पथकाने राज्यातील १७० पालिकांपैकी ६८ जणांकडील मृत्यू नोंदणीचे रेकॉर्ड तपासले.

या नोंदवहीच्या विश्‍लेषणातून ६८ पालिकेत मार्च २०२० आणि एप्रिल २०२१ दरम्यान कोरोना येण्यापूर्वी एक वर्ष अगोदर २०१९ च्या कालावधीच्या तुलनेत अन्य आजाराने १६,८९२ जणांचा मृत्यू झाला. ६८ पालिकांत एका अंदाजाने कोरोनामुळे राज्यात किमान २.८१ लाख जणांचा मृत्यू झाला असून सरकारने दिलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या २७ पट अधिक असू शकते.

एप्रिल २०२१ मध्ये ६ टक्के लोकसंख्येत कोविड वगळता अन्य कारणांमुळे १०,२३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ही आकडेवारी कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या १०,०७५ अधिकृत आकड्यापेक्षा जास्त असू शकते.

एकट्या एप्रिल महिन्यात गुजरात राज्यात १.७१ लाख अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे अद्याप मे २०२१ पर्यंत कोरोनाची दुसरी लाट असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा राज्य सरकारकडून मिळाला नाही.

कोरोना काळातील मृतांची आकडेवारी

गुजरात सरकारने कोरोना काळात राज्यात केवळ १०,०७५ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. परंतु ६८ पालिकेच्या एप्रिल २०२१ च्या मृत्युची नोंद ठेवणाऱ्या पुस्तिकेची माहिती घेतल्यास १२,७५७ जणांचा कोविडसह विविध कारणांमुळे मृत्यु झाला आहे. २०१९ च्या तुलनेत ही संख्या १०,२३८ ने अधिक असू शकते.

सरकारकडून स्पष्ट रूपात सूचना देऊनही भारतात कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची नोंद ठेवली जात नसल्याचे दिसून येते. यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र काही बाबत कमकुवत प्रशासन देखील जबाबदार आहे. काही राज्यांत जाणीवपूर्वक कोविडमुळे होणाऱ्या मृत्युची नोंद ठेवली जात नसल्याचे आढळून येत आहे.

- मुराद बानाजी, गणितज्ञ, मिडिलसेक्स युनिर्व्हर्सिटी, लंडन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT