देश

राष्ट्रीय एकता दिवस: अमित शहांनी वाहिली सरदार पटेलांना आदरांजली

सकाळ डिजिटल टीम

केवडिया: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातमधील केवडिया याठिकाणी पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सर्वांत आधी सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला वंदन केलं.

या कार्यक्रमामध्ये भारतीय हॉकी टीमचे कप्तान मनप्रीत सिंह यांच्या व्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळात पदकांची कमाई केलेले खेळाडू देखील उपस्थित आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रेकॉर्डेड व्हिडीओच्या माध्यमातून संबोधन करणार आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-20 शिखर संमेलनामध्ये सहभागी असल्याने या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीयेत.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अमित शाह याठिकाणी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील त्यानंतर ते परेड पाहतील ज्यामध्ये अर्धसैनिक आणि गुजरात पोलिसदल सहभागी होणार आहे. इथे वेगवेगळ्या कसरती दाखवल्या जाणार आहेत. तसेच याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT