Vadodara Chemical Factory Blast esakal
देश

केमिकल कारखान्याला भीषण आग; 7 कामगार जखमी, 700 स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

सकाळ डिजिटल टीम

सध्या भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुजरातमधील (Gujarat) वडोदरा शहराबाहेरील नंदेसरी औद्योगिक परिसरातील एका रासायनिक कारखान्याला (Vadodara Chemical Factory Blast) गुरुवारी रात्री भीषण आग लागलीय. दीपक नायट्रेट केमिकल्स प्रोडक्शन प्लांटच्या (Fire at Dipak Nitrite) एका भागात आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. ते म्हणाले, सात कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कारखान्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येतंय.

वडोदरा जिल्हा दंडाधिकारी आर. बी. ब्रार म्हणाले, आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय. सध्या भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. आगीमुळं धुराच्या लोटात आलेल्या सात जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर, खबरदारी म्हणून कारखान्याजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलंय.

वडोदरा अग्निशमन दलाच्या (Vadodara Fire Brigade) अधिकाऱ्यानं सांगितलं की, संध्याकाळी जेव्हा कारखान्यात आग पसरू लागली, तेव्हा एक शक्तिशाली स्फोटही झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भरूच जिल्ह्यातील दहेज इथं असलेल्या भारत रसायन कंपनीच्या कारखान्यालाही नुकतीच भीषण आग लागली होती. या आगीत 25 कामगार जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

German bakery blast: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर श्रीरामपूरमध्ये गोळीबार; दुचाकीवरुन दोघे आले अन्...

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगरमधील माजी उप-महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Temple Tour 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीला घ्या 'या' 5 मंदिरांचे दर्शन; मोठे संकट होणार दूर, मिळेल यश अन् बनेल धनलाभ योग

Pimpri Crime : पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरांकडून १२ घरफोडी उघड; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Railway Recruitment 2026: रेल्वे विभागात नवीन भरती सुरू; अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT