india covid 
देश

देशात आणखी एका आजाराचा शिरकाव; गुजरातमध्ये ९ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली - सध्या जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचे जवळपास एक कोटी रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत लाखाहून अधिक जणांचा कोरोनामुळे देशात मृत्यू झाला आहे. यावर अद्याप कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. दरम्यान, कोरोनाचा कहर कमी झालेला नसतानाच आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्यूकोरमाइकोसिस असं या आजाराचं नाव असून भारतातील काही शहरांमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये या आजारामुळे 44 रुग्णांपैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 

म्यूकोरमाइकोसिस हा एक दुर्मिळ असा फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे. याचं इन्फेक्शन झालेल्या रुग्णामध्ये किटाणूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते. यात चेहऱ्यावरती सूज येणं, डोकेदुखी, तोंडाच्या वरच्या भागात वेदना यांसारखी लक्षणे दिसतात. तसंच डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. वेळेत आणि योग्य उपचार झाले नाही तर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. 

दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात अशा आजाराची लागण झालेले 13 रुग्ण उपाचर घेत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील निम्म्या रुग्णांच्या डोळ्यांना इजा झाली असून ते निकामी झाले आहेत. तसंच काही रुग्णांच्या मेंदूलाही धोका निर्माण झाला असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

सध्याच्या वातावरणात प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना अशा प्रकारच्या आजाराचा धोका संभवतो. तसंच मधुमेह किंवा इतर आजार असलेल्यांनी काळजी घ्यायला हवी. 

कोरोनाची लागण झालेल्या आणि बरे झालेल्यांनी मधुमेह असल्यास तो नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवणं हाच यावर उपाय आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेची सवय, मास्कचा वापर यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता. प्राथमिक स्वरुपात असतानाच या आजारावर उपाचर केल्यास रुग्णाला बरं कऱणं शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT