crime sakal
देश

गुजरातचे जप्त करण्यात आलेले हेरॉइन २१ हजार कोटींचे

जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलोग्रॅम वजनाच्या हेरॉइनची किंमत ही तब्बल २१ हजार कोटी रुपये एवढी असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयाकडून (डीआरआय) देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

भूज (गुजरात) : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलोग्रॅम वजनाच्या हेरॉइनची किंमत ही तब्बल २१ हजार कोटी रुपये एवढी असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयाकडून (डीआरआय) देण्यात आली.

याबाबत ड्रग्जचे रॅकेट चालविणाऱ्या एका दाम्पत्याला चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून येथे आणण्यात आल्याचे कळल्यानंतर ‘डीआरआय’ने कारवाईचा बडगा उगारला होता. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नोंदणी असलेल्या एका कंपनीने हे अमली पदार्थ मागविले होते. अर्धवट प्रक्रिया झालेले हे पावडरचे टणक गोटे आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ते गुजरातेतील मुंद्रा बंदरात आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी या भागांत छापे घालण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून याप्रकरणी कारवाई सुरू होती.

दाम्पत्याला कोठडी

एम. सुधाकर आणि त्याची पत्नी दुर्गा वैशाली यांच्या मालकीच्या अशी ट्रेडिंग कंपनीने हे हेरॉइन भारतामध्ये आयात केले होते. या दाम्पत्याला डीआरआयने चेन्नईतून अटक केली असून त्यांना कच्छ येथे आणले आहे. या दोघांनाही १० दिवसांची कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT