देश

हिंदु बहुसंख्य असेपर्यंतच संविधान आणि कायदा - नितीन पटेल

सकाळ डिजिटल टीम

पटेल म्हणाले की, तुम्ही रेकॉर्ड करून घेणार असाल तर घ्या किंवा शब्द लिहून ठेवा. आपल्या देशात काही लोक संविधान आणि धर्मनिरपेक्षतेवर बोलतात.

संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याने गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा तोपर्यंतच राहील जोपर्यंत हिंदूंची संख्या जास्त असेल. हिंदू जर अल्पसंख्यांक झाले तर काहीच राहणार नाही. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शुक्रवारी गांधीनगर इथे भारत माता मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.

पटेल म्हणाले की, तुम्ही रेकॉर्ड करून घेणार असाल तर घ्या किंवा शब्द लिहून ठेवा. आपल्या देशात काही लोक संविधान आणि धर्मनिरपेक्षतेवर बोलतात. पण संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा यावर चर्चा होते. असं तोपर्यंतच होईल जोपर्यंत देशात हिंदू बहुसंख्य आहे. ज्यादिवशी हिंदूंची संख्या कमी होईल आणि इतरांची वाढेल तेव्हा ना धर्मनिरपेक्षता असेल ना लोकसभा, ना संविधान. सगंळ जाईल आणि दफन होईल, काहीच शिल्लक राहणार नाही.

पटेल यांनी असंही म्हटलं की, 'मी सगळ्या लोकांबद्दल बोलत नाही. मी हेसुद्धा स्पष्ट करतो की, मुस्लिम आणि ख्रिश्चन हेसुद्धा देशभक्त आहेत. हजारो मुस्लिम भारतीय सैन्यात आणि गुजरात पोलिसात आहेत.' या कार्यक्रमावेळी गुजरातचे गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यासह विहिंप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित होते.

धर्मांतरणाबाबतही पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटंल आहे. गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या निर्णयात धर्मांतराविरोधात कायद्यातील काही कलमे आणि त्यातील तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने इतर कलमांशिवाय कलम 5 च्या वापराला स्थगिती दिली होती. लग्नाच्या माध्यमातून धर्मांतरणाशी संबंधित हे कलम आहे. राज्य सरकारने म्हटलं की, हे कलम पूर्ण कायद्याचं मूळ आहे आणि यावर स्थगिती आणल्यास कायद्यावर प्रभाव पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT