seizes heroin sakal
देश

पाकिस्तानी नौकांमधून 300 कोटींचे हेरॉईन जप्त; 9 जणांना अटक

ही घटना गुजरातजवळील जाखो येथील अरबी समुद्रात घडली आहे.

दत्ता लवांडे

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलांच्या जवानांनी भारताच्या सागरी सीमेवर पाकिस्तानी नौकांमधून 300 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याचबरोबर 9 पाकिस्तानी तस्करांना तटरक्षक दलांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुजरातजवळील जाखो येथे अरबी समुद्रात घडली आहे.

गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत अल हज या पाकिस्तानी बोटीची गुजरातच्या किनारपट्टीवर जाखोजवळ घेराव घालून झडती घेण्यात आली, त्यात सुमारे 56 किलो हेरॉईन पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर एटीएसने नऊ पाकिस्तानी तस्करांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने मिळून अरबी समुद्रात पाण्याच्या आत एक पाकिस्तानी बोट पकडली, ज्यामध्ये नऊ जण होते. त्यांच्याकडे जवळपास 300 कोटी किंमतीचे हेरॉईन आढळून आले, त्यानंतर एटीएसकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं असून नऊ पाकिस्तानी तस्करांनाही ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान चार दिवसांपूर्वी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदरावर 260 किलो वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. दहशतवादविरोधी पथक आणि महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली होती. त्या 260 किलो अंमली पदार्थाची किंमत सुमारे 1300 कोटी इतकी होती असं महसूल विभागाने सांगितलं होतं.

गुजरातमध्ये बंदर परिसरात सारख्या अंमली पदार्थाच्या तस्करीच्या घटना होत असतात. अंमलीपदार्थ तस्करी विरोधी पथकाकडून आणि एटीएसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT