देश

पटेलांची काँग्रेसशी "हार्दिक' हातमिळवणी

वृत्तसंस्था

भाजपला विरोध; आरक्षणाची मागणी मान्य

अहमदाबाद : पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी विधानसभा निवडणुकीत पंजाशी हातमिळवणी करत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आज जाहीर केले. विशेष श्रेणीतून पटेल समाजाला आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतल्याचे समितीच्या वतीने आज युवा नेते हार्दिक पटेल यांनी जाहीर केले. अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाला हात न लावता पटेलांना आरक्षण दिले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घातलेल्या 50 टक्‍क्‍यांच्या मर्यादेचे काय, असा सवाल माध्यमांनी करताच हार्दिक यांनी न्यायालयाचा हा निकाल केवळ सूचना असल्याचे म्हटले आहे. सत्ता मिळताच पटेलांना आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने दिले आहे. यासाठी विधिमंडळामध्ये विधेयक देखील मांडले जाणार आहे. गुजरातमध्ये माझा संघर्ष भाजपशी आहे त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला पाठिंबा देऊ, असे हार्दिक यांनी नमूद केले.

सर्वेक्षण केले जाणार
आमच्या अनेक मागण्यांचा समावेश काँग्रेसने जाहीरनाम्यामध्येही केला आहे, सरकारने स्थापन केलेला आयोग आरक्षणासाठी सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणानंतरच आरक्षणाचे प्रमाणही निर्धारित केले जाईल, असे हार्दिक यांनी नमूद केले. या नव्या सूत्रानुसार अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या 49 टक्के आरक्षणाला कोणताही धक्का लावला जाणार नाही. ज्या जातसमूहांना राज्य घटनेच्या कलम 31(क) आणि कलम 46 अन्वये आरक्षण मिळालेले नाही त्यांना वेगळ्या श्रेणीतून आरक्षण देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव असल्याचे हार्दिक यांनी स्पष्ट केले.

कॉंगेसशी मतभेद नाहीत
जागावाटपाबाबत आमचे काँग्रेसशी मतभेद नाहीत. आम्ही कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी केलेली नाही; पण आमच्या समाजातील स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांना तिकिटे दिली जायला हवीत असे आम्हाला वाटते, असेही हार्दिक यांनी सांगितले. पण ज्या मंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याबाबत समिती काय निर्णय घेणार असे विचारले असता हार्दिक म्हणाले, की ही मंडळी आता संघटनेची सदस्य राहिलेली नाहीत. भाजपने आमच्या सदस्यांना खरेदी करण्यासाठी 50 लाखांची ऑफर देऊ केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला पाठिंबा दिल्याबद्दल मी हार्दिक यांचे आभार मानतो. आम्ही एकत्रितपणे लढून भाजपची राजवट उखडून टाकू.
- कपिल सिब्बल, काँग्रेस नेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT