narendra modi
narendra modi 
देश

काँग्रेसकडून पटेलांची दिशाभूल : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

लुनावडा (गुजरात): पटेल आरक्षणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसला धारेवर धरले, आरक्षणाबाबत काँग्रेस पक्ष पटेलांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पटेलांना आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा टक्का कमी करावा लागणार असून त्याचा वाटा पटेलांना द्यावा लागेल. मुस्लिम कोट्याबाबतही काँग्रेसने अशीच चुकीची आश्‍वासने दिली होती, असा आरोप मोदी यांनी येथील सभेत बोलताना केला.

पटेल आरक्षण आंदोलनामुळे प्रदेश भाजपची चांगलीच कोंडी झाली होती, आज मोदी यांना थेट याच मुद्याला हात घालत "आरक्षणाची अंदर की बात' उपस्थितांना सांगितली. काँग्रेसने देशभर विविध राज्यांतील मुस्लिमांना आरक्षणाचे लॉलीपॉप देऊ केले होते, मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा हा पक्ष करत होता. मी माझ्या मुस्लिम मित्रांना एक प्रश्‍न विचारू इच्छितो खरंच तुम्हाला आरक्षण मिळाले आहे का? आरक्षण मिळाले नसेल तर मग हे खोटे आश्‍वासन नव्हते का? गुजरातमध्ये त्यांनी हेच आश्‍वासन अन्य एका समाजाला दिले होते. पण या समाजाला आरक्षण काँग्रेस कोठून देणार आहे? असा सवालही मोदींनी या वेळी केला. तत्पूर्वी पटेल आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसने अनुकूल भूमिका घेतल्यानंतर हार्दिक पटेल यांनी आपला हात काँग्रेसच्या हातात दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT