Fire Accident Sakal
देश

गुजरातमध्ये कंपनीत स्फोट; ६ कामगारांचा मृत्यू

सदर घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : काल रात्री उशीरा गुजरातमधील भरुच येथील एका कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घडली. यामध्ये ६ कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहीती आहे. भरूच येथील OM Organic या कंपनीच्या आवारात हा स्फोट झाला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुजरातमधील भरुच येथील OM Organic या कंपनीच्या आवारात काल रात्री अचानक स्फोट झाला. यामध्ये कंपनीत काम करणाऱ्या ६ मजूरांचा मृत्यू झाला. दरम्यान लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान, पोलिस आणि इतरांनी मदत केली.

झालेल्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं असून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी ट्वीट करत गुजरातमधील भरुच येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान सदर घटनेसंदर्भात काही निष्काळजीपणा होता का याबाबत अधिक तपास पोलिस करत असल्याचं भरुच येथील SP लीना पाटील यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT