Gujrat Riots 2002  esakal
देश

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीप्रकरणात तीस्ता सेटलवाड यांनी आत्मसमर्पण करावं! हायकोर्टाचे आदेश

संतोष कानडे

Gujarat Riots News : गुजरात हायकोर्टाने शनिवारी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना २००२ मधील गुजरात दंगली प्रकरणात पुरावे देणे आणि साक्षीदारांना प्रशिक्षण देण्याच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्यांनी तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत.

गुजरात उच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मागच्या वर्षीपासूनच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यामुळे अटक झाली नाही. परंतु आता हायकोर्टाच्या आदेशानुसार गुजरात पोलिस त्यांना कधीही अटक करु शकतात.

तीस्ता सेटलवाड आणि माजी वरिष्ठ पोलिस आर.बी. श्रीकुमार यांना कथितपणे खोटे पुरावे गोळा करणे, गुन्हेगारी कट रचणे या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर तीस्ता सेटलवाड यांची सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमधील साबरमती तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं

गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ६२ राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती. जी कायद्याचा गैरवापर करणे योग्य नाही असे म्हणत जून २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सुप्रीम कोर्टाने एसआयटीच्या तपासाचे कौतुक करत कायद्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांचेही नाव घेतले आणि सेटलवाड यांच्या विरोधात आणखी चौकशीची गरज असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT