Kejriwal & Modi  Sakal
देश

Video : पैसे भाजपचे काम 'आप' चे; मोदींच्या गुजरातममध्ये केजरीवालांचा कानमंत्र

गुजरातमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी केजरीवालाच्या पक्षाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Arvin Kejriwal News : गुजरातमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी केजरीवालाच्या पक्षाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील विजयासाठी आम आदमी पक्षाने आपली सर्व ताकद पणाला लावली असून, विजयी मोहोर उमटवण्यासाठी केजरीवालांनी गुजरातला अनेक दौरे केले आहे. मात्र, आजच्या गुजरात दौऱ्यामध्ये त्यांनी दिलेल्या कानमंत्राची जोरदार चर्चा सुरू असून, तुम्ही भाजप सोडू नका, भाजप तुम्हाला पैसे देते ते घ्या मात्र, काम आपचे करा असा कानमंत्री केजरीवाल यांनी मोदींच्या गुजरातमध्ये दिला आहे.

आमच्या पक्षाला भाजपचे मोठ मोठे नेते नको तर, त्यांच्या पन्नाप्रमुखांची आणि कार्यकर्त्यांची गरज असून, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीमध्ये सामील होत असल्याचा दावादेखील केजरीवाल यांनी केला आहे. यावेळी मी कृतघ्न नाही. तुमच्या सर्व मागण्या मी महिनाभरात पूर्ण करेले अशी ग्वाही उपस्थितांना संबोधित करताना दिली. भाजपला त्यांचा पराभव दिसून येत असल्यानेच आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ले केले जात आहे. मात्र, आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही.

सुरतमध्ये 12 पैकी 7 जागा 'आप' जिंकेल

केजरीवाल म्हणाले, पक्षातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आमचा पक्ष सुरतमध्ये 12 पैकी 7 जागा जिंकेल असे स्पष्ट चित्र आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे सर्वांनी आपापल्या स्तरावर प्रचार करावा असे आवाहनही केजरीवाल यांनी जनतेला केले आहे. 27 वर्षे भाजपने कर्मचाऱ्यांसाठी काहीही केलेले नसून निवडणुकीच्या तीन महिने आधी त्यांना पुन्हा लॉलीपॉप देतील अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT