sunita yadav 
देश

'वर्दी तुझ्या बापाने दिली नाही',असं मंत्र्यांच्या मुलाला सुनावणाऱ्या सुनिताचा राजीनामा

सूरज यादव

सूरत - गुजरात सरकारमधील मंत्री कुमार कनानी यांचा मुलगा आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यातील वाद आता आणखी चर्चेत आला आहे. या प्रकरणामध्ये महिला कॉन्स्टेबलला सोशल मीडियावरून मोठा पाठिंबा मिळत आहे. कुमार कनानी यांच्या मुलाने कॉन्स्टेबलला बदली करण्यासह वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. यानंतर महिला कॉन्स्टेबल सुनिता यादवने म्हटलं होतं की, 'मी सरकारी नोकरी करते कुणाच्या बापाची नाही. ते इतर लोक असतील जे नेता आणि मंत्र्यांची गुलामी करतात. वर्दी तुझ्या बापाने दिली नाही.'आता सुनिताने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

मंत्र्यांच्या मुलाशी वाद झाल्यानंतर सुनिताला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्याआधी सुनिताने राजीनामा दिला मात्र तो स्वीकारला नाही. त्यानंतर त्याच भागत तिची बदली करण्यात आली असल्याची माहिती समजते. ही बदली म्हणजे मंत्र्याच्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणेच असल्याचं सुनिताने म्हटलं आहे. 

मंत्री कुमार कनानी यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले होते. त्यांना अडवल्यानंतर महिला कॉन्स्टेबल सुनिताला धमकीही देण्यात आली होती. मंत्र्याचा मुलगा प्रकाशने सुनिताला अशी धमकी दिली होती की, तुम्हाला या ठिकाणी 365 दिवस उभा करण्याची ताकद आमच्याजवळ आहे. प्रकाशवर असाही आरोप कऱण्यात आला आहे की, त्याने महिला कॉन्स्टेबलला तिची वर्दी उतरवू अशीही धमकी दिली होती. 

महिला कॉन्स्टेबल सुनिताने प्रकाशला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ती म्हणाली होती की, मी तुमची गुलाम नाही. तसंच वडिलांची सेवक नाही जे तिला 365 दिवस उभा करू शकतील. मी सरकारची नोकरी करते, कोणाच्या बापाची नाही. इतर लोक करत असतील गुलामी. आम्ही आमच्या स्वाभीमानाशी तडजोड न करता नोकरी केली आहे. वर्दीसाठी भारतमातेची शपथ घेतली आहे. 

सुनिता यादवनं आरोप केला होता की, रात्रीच्या वेळी कर्फ्युवेळी काही लोकांना तिने अडवलं तेव्हा तिला धमकी देण्यात आली. त्यानंतर सूरतचे पोलिस आयुक्त आर बी ब्रह्मभट्ट यांनी शनिवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रकाश कनानीच्या मित्रांना अडवलं होतं. त्यावेळी मित्रांनी बोलावल्यानंतर प्रकाश कनानी त्याठिकाणी आला आणि कॉन्स्टेबल सुनिता यादवशी वाद घातला होता. 

दरम्यान, मंत्र्यांनी दावा केला आहे की, त्यांचा मुलगा त्याच्या सासऱ्याला पाहण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात निघाला होता. त्यांना कोरोना झाला असून प्रकृती नाजूक होती. त्याचवेळी महिला कॉन्स्टेबलने त्याला थांबवलं. त्याने जाऊ देण्यासाठी विनंती केली तेव्हा महिला कॉन्स्टेबलने गाडीवर आमदार का लिहिलं आहे यावरून प्रश्न विचारला. तसंच त्या गाडीत तुम्ही का आहात असंही विचारलं. त्यांनी समजून घ्यायला हवं होतं की मुलगा काय सांगतो. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे म्हणणे ऐकायला हवे होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT