देश

दहशतवाद्यांकडून भाजपनेत्याची गोळ्या झाडून हत्या

वृत्तसंस्था

अनंतनागः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या.

एकूण पाचपैकी छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या लागल्यामुळे मीर यांचा मृत्यू झाला. 60 वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजपउपाध्यक्ष होते. त्यांना परिसरात अटल नावाने ओळखलं जायचं. त्यांनी जम्मू काश्मिर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मिरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.

हत्याकांडानंतर पोलिसांनी नौगाम परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT