Ghulam Nabi Azad News  esakal
देश

Gulab Nabi Azad : मी जे बोललो त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला.. ; वादग्रस्त वक्तव्यावर आझादांनी दिले स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

Gulab Nabi Azad : पूर्वी मुस्लिम हे हिंदू होते इस्लामचा जन्म भारतात झाला नाही...', असे विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केले होते. यामुळे एकच खळबळ संपूर्ण भारतात उडाली होती. या वक्तव्यावर कित्येकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

या विधानावर माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी ते म्हणाले कि, मी जे बोललो त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला नाही, पर्यायी नागरिकांमध्येे संभ्रम निर्माण झाला आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले कि, खरं तर मी हिंदू-मुस्लिमच्या इतिहासाबद्दल बोलत होतो. काही लोक नेहमी म्हणतात की मुस्लिम बाहेरून आले आहेत. मात्र फार कमी हे मुस्लिम बाहेरून आले आहेत. इस्लाम धर्म हा जगात आणि भारतातही तलवारीच्या जोरावर कधीच आलेला नाही, तर प्रेमआणि संदेशातून आला आहे.

त्यावेळी पुढे गुलाम नबी आझाद म्हणाले कि "मी असेही सांगितले होते की आपल्या देशात हिंदू धर्म खूप जुना आहे. कारण इस्लामचा जन्म आपल्या देशात झाला नाही. तर इथे पसरला आहे. जगात इस्लामचा प्रसार अनेक शतकांपासून हळूहळू झाला आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये आझाद जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगताना दिसत होते की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ऐन हिवाळ्यात थंडी गायब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Latest Marathi News Live Update : टीईटी पेपरफुटी प्रकरणी मुख्य सूत्रधार गायकवाडसह नऊ जणांना अटक

विश्‍वविजेतेपदाची ‘गंगा’ आली अंगणी; सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

Ram Mandir Flag Hoisting : राम मंदिर ध्वजारोहणात खाकी नाही तर 'सूट-बूट'मध्ये दिसणार युपी पोलीस; का झाला हा बदल?

अभिनेते धर्मेंद्र यांना आवडायची सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी; चित्रकाराने काढली १०० हून अधिक चित्रे, जुन्या आठवणी जागवल्या !

SCROLL FOR NEXT