gulam nabi azad Sakal
देश

गुलाम नबी आझाद 20 दिवसांत करणार नवा पक्ष स्थापन; माजी मंत्र्यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद येत्या 20 दिवसांत राष्ट्रीय राजकीय पक्षाची स्थापन करतील आणि जम्मू-काश्मीरसाठी येणाऱ्या निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं त्यांच्या निकटवर्तीय आणि माजी मंत्री जीएम सरोरी यांनी सांगितलं. ते काँग्रेसचे जेष्ठ नेते होते, २६ ऑगस्ट रोजी त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

(Gulam Nabi Azad New Political Party Updates)

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील पाच बड्या काँग्रेस नेत्यांनीही पक्षातील आपापल्य पदाचा राजीनामा दिला होता. गुलाम नबी आझाद भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा होत असताना आपण लवकरच नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी घोषित केलं होतं.

गुलाम नबी आझादा यांच्या समर्थनार्थ जीएम सरूरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट्ट, गिलजार अहमद वानी आणि चौधरी मोहम्मद अकरम या पाच नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. तर काँग्रेसमधील या गळतीनंतर तेलंगणामध्येही माजी खासदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. आझाद यांनीही पक्षाच्या निर्णयाबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय़ घेतील, अशी चर्चा सुरू होतीच. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT