देश

बाबा राम रहिमला झेड प्लस सुरक्षा; तुरुंगातून सध्या फर्लोवर बाहेर

सकाळ डिजिटल टीम

तुरुंगातून फर्लोवर बाहेर असलेल्या राम रहिमला झेड प्लस सुरक्षा दिली आहे.

चंदिगढ - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Ram Rahim) सध्या फर्लोवर तुरुंगातून बाहेर आहे. एडीजीपींनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर आता हरयाणा (Haryana) सरकारने झेड प्लस सुरक्षा (Z plus Security) त्याला पुरवण्यात आली आहे. राम रहिमच्या जीवाला खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांकडून धोका असल्याने ही सुरक्षा पुरवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला हायकोर्टात माहिती देण्यात आली होती.

उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून असीही माहिती समोर आली होती की डेरा प्रमुख गुरमीत राम रहिमला खलिस्तानी समर्थकांचा धोका आहे. यामुळे हरयाणा सरकारने तुरुंगातून फर्लोवर बाहेर असलेल्या राम रहिमला झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाधिवक्त्यांकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर राम रहिमला झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी हालचाल सुरु करण्यात आली होती.

महाधिवक्त्यांनी म्हटलं होतं की, राम रहिमला हार्ड कोअर क्रिमिनल श्रेणीत ठेवता येणार नाही. त्याला खून प्रकरणात त्याच्या सह आरोपींसोबत मिळून कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष हत्येसाठी दोषी नाही.

राम रहिमला फर्लो प्रकरणी हरयाणा सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला संपूर्ण अहवाल सोपवला. सरकारने स्पष्ट केलं की, फर्लोचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनुसार घेण्यात आला आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने कामकाजाची वेळ संपल्यानं सुनावणी बुधवारी करणार असल्याचं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT