gurugram lightning news  
देश

झाडाचा आडोसा घेणं पडलं महागात; अचानक वीज कोसळली अन्...

सकाळवृत्तसेवा

पाऊस म्हटलं की सगळं वातावरण कसं नयनरम्य होतं. त्यामुळे हा ऋतू अनेकांना आवडतो. अनेक जण पावसामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. तर काही जण मात्र, पाऊस दिसला की त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. परंतु, पावसापासून वाचण्यासाठी जर तुम्ही झाडाचा किंवा अन्य कोणत्याही अन्य जागेचा आडोसा घेत असला तर त्यापूर्वी ती जागा सुरक्षित आहे की नाही हे नक्कीच तपासून पाहा. कारण, गुरुग्राम येथे झाडाचा आडोसा घेणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर चक्क वीज कोसळल्याचं समोरं आलं आहे.  या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेतील तीन जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुरुग्राम येथील आहे.  गुरुग्राम सेक्टर ८२ मध्ये ही घटना घडली आहे. पाऊस येत असल्यामुळे चार तरुण एका झाडाच्या अडोशाला थांबले होते. मात्र, अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली. विशेष म्हणजे हा प्रसंग काही सेकंदामध्ये घडल्यामुळे अनेक जण थक्क झाले आहेत. वीज कोसळ्यानंतर चारही व्यक्ती जागीच कोसळले. यातील तीन जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घटना घडली आहे. हे चारही व्यक्ती सिग्नेचर बिलाज सोसाटीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. पाऊस आल्यामुळे हे चारही जण झाडाच्या आडोशाला थांबले. मात्र, अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली.  या घटनेनंतर अनेक जण सावध झाले असून हा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : देशात हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन असा कोणताही धर्म धोक्यात नाही - योगगुरु रामदेवबाबा

Kolhapur Maternal Death : आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! आठव्या महिन्यात सिझेरियन, बाळाला जन्म देताच काही क्षणांतच आईने सोडला प्राण

SCROLL FOR NEXT