jyotiraditya scindia  
देश

ज्योतिरादित्य शिंदेंचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा हॅक; पोस्ट केला त्याचप्रकारचा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. शनिवारी जवळपास एक तासभर हे अकाऊंट हॅकरच्या हातात होते. हॅकरने इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव बदलून श्रेया अरोरा असं ठेवलं होतं. सोबतच एक असा व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये असताना दिलेलं भाषण आहे, ज्यात ते भाजपवर टीका करताना दिसतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत याआधी देखील असाच प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्या शिंदे यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट सकाळी जवळपास 10.45 वाजता हॅक करण्यात आलं होतं.

शिंदे यांनी मार्च 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना ऑगस्ट 2021 मध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या विस्तारामध्ये केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांचं अकाऊंट हॅक झालं होतं. तेंव्हा देखील याचप्रमाणे एक जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. याचप्रकारे गेल्या वर्षी जेंव्हा त्यांची राज्यसभेमध्ये निवड झाली तेंव्हा देखील त्यांच्या फेसबुक अकाऊंट हॅक झालं होतं. या व्हिडीओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे भाजप सरकारवर जोरदार टीका करताना दिसून येतात. त्यामुळे विशिष्ट राजकीय आकसापोटीच त्यांचं हे अकाऊंट हॅक करण्यात येत असल्याचा संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT