Gyanvapi Case  Gyanvapi Case
देश

Gyanvapi case : मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली; कोर्ट घेणार सुनावणी

या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण वाराणसीमध्ये जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी परिसरातील श्रृंगार गौरी देवीचं नियमित दर्शन-पूजन प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. कोर्टानं मुस्लीम पक्षकारांचं अपील फेटाळलं असून हे प्रकरणं सुनावणी योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं या प्रकरणी आता २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Gyanvapi case Petition of Muslim parties rejected in Gyanvapi case court will hold a hearing)

हिंदू पक्षकारांच्या बाजूनं दिला निर्णय

स्थानिक कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा निर्णय दिला असून त्यांनी मुस्लिम पक्षकारांचं अपील फेटाळून लावलं असून हिंदू पक्षकारांचं अपील स्विकारलं. तसेच हे प्रकरणी सुनावणी योग्य असल्याचं सांगत २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. या सुनावणीवेळी मुस्लिम पक्ष कोर्टात उपस्थित नव्हते.

हिंदू पक्षकारांमध्ये आनंदाचं वातावरण, दिले हर हर महादेवचे नारे

कोर्टाच्या निर्णयानंतर हिंदू पक्षकारांमध्ये आनंदाचं वातावण पसरलं असून त्यांनी कोर्टाच्या परिसरात हर हर महादेवचे नारे द्यायला सुरुवात केली. कोर्टानं २६ पानी निर्णय सुनावला असून केवळ दहा मिनिटांत कोर्टानं आपला निर्णय वाचून दाखवला. यावेळी सर्व पक्षकार उपस्थित होते.

तीन मुद्यांवर झाली सुनावणी

जिल्हा न्यायाधीशांनी मुस्लीम पक्षकाराचं अर्ज फेटाळून लावला. तसेच प्रामुख्यानं तीन मुद्द्यांवर याबाबत सुनावणी झाली. यामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट, काशी विश्वनाथ ट्रस्ट आणि वक्फ बोर्डाची भूमिका तसेच श्रृंगार गौरी दर्शन-पूजन वाद या मुद्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT