Gyanvapi survey Esakal
देश

Gyanvapi survey: 'ज्ञानवापीचे तळघर उघडावे, सील केलेल्या भागाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करावे', हिंदू पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Gyanvapi survey: अर्जात वादग्रस्त जागेवर कृत्रिम भिंतींनी सील केलेली वाराणसी मशिदीची 10 तळघरे उघडण्याची आणि त्यामध्ये ASI मार्फत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात हिंदू पक्षांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वाराणसीच्या ज्ञानवापी संकुलात असलेल्या शिवलिंगाचे (हिंदू दाव्यानुसार) भारतीय पुरातत्व विभागाला (ASI) वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू पक्षांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत वाजुखान्याचे सील उघडून शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्याची मागणी असून दुसऱ्या याचिकेत दहा तळघरांचे सर्वेक्षण करण्याची मागणी आहे.

हिंदू पक्षाने दाखल केली याचिका

शिवलिंगाला इजा न करता हे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावे, असा अर्ज हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सध्या वादग्रस्त जागेतील वजुखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संरक्षित आहे. तिथे हिंदू पक्ष हे आदि विश्वेश्वराचे शिवलिंग असल्याचा दावा करत आहेत. तर मुस्लीम पक्ष याला कारंजे असल्याचे म्हटलं आहे.

हिंदू बाजूने असे म्हटले आहे की, या भागाचे मुस्लिमांसाठी कोणतेही धार्मिक महत्त्व नाही कारण त्यांच्या मते तेथे एक कथित कारंजे आहे. पीठ, पीठिका इत्यादी शिवलिंगाशी निगडित मूळ वैशिष्ट्ये लपवण्यासाठी हे आधुनिक बांधकाम जाणीवपूर्वक केले गेले आहे. शिवलिंगाच्या परिसरात कृत्रिम भिंती उभारण्यात आल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे.

10 तळघर उघडले पाहिजेत

हिंदू पक्षाच्या याचिकेत ज्ञानवापी येथील सील केलेले क्षेत्रही खुले करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला सीलबंद जागेत सर्वेक्षण करण्यास बंदी घालणारा आदेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. अर्जात वादग्रस्त जागेवर कृत्रिम भिंतींनी सील केलेली वाराणसी मशिदीची 10 तळघरे उघडण्याची आणि त्यामध्ये ASI मार्फत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ज्ञानवापीला हिंदू मंदिर घोषित करावे - VHP

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार यांनी शनिवारी सांगितले की एएसआयने ज्ञानवापी संरचनेतून गोळा केलेले पुरावे हे पुष्टी करतात की मशीद भव्य मंदिर पाडल्यानंतर बांधली गेली होती. ते म्हणाले की, मंदिराच्या संरचनेचा एक भाग, विशेषत: पश्चिम भिंत हा हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे. मशिदीच्या बांधकामात फेरफार करून पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचे काही भाग, ज्यात खांबांचा समावेश होता, ते पुन्हा वापरण्यात आल्याचेही अहवालात सिद्ध होते.

आलोक कुमार म्हणाले की, एएसआयने गोळा केलेले पुरावे आणि निष्कर्ष हे सिद्ध करतात की, या प्रार्थनास्थळाचे धार्मिक वैशिष्ट्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात होते आणि सध्या ते हिंदू मंदिराच्या रूपात आहे. अशा प्रकारे, पूजा स्थळ कायदा, 1991 च्या कलम 4 नुसार, या संरचनेला हिंदू मंदिर घोषित केले जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video

Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

T20 Mumbai Women's League: सोबो मुंबई फाल्कन्सला सायली सातघरेच्या नेतृत्वात विजेतेपद! मुंबई वेस्टर्न सबर्ब्स फायनलमध्ये पराभूत

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT