h3n2 influenza  esakal
देश

New Virus : अमेरिका, हाँगकाँगनंतर 'या' खतरनाक व्हायरसची दिल्लीत एन्ट्री

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये सध्या श्वसनाशी संबंधित रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतल्या वातावरणातदेखील सतत बदल होत असल्याने एका नव्या व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे.

इन्फ्लूएंझा व्हायरसचा नवा व्हेरिएंट सध्या दिल्लीकरांची डोकेदुखी वाढवत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार या वर्षी जानेवारी महिन्यात इन्फ्लूएंझाच्या नव्या व्हेरिएंटने दिल्लीत एन्ट्री केली. या व्हायरसचं नाव H3N2 इन्फ्लूएंझा असं आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एच३एन२ इन्फ्लूएंझा व्हायरस हा एक प्रकारचा फ्लू आहे. प्रामुख्याने या व्हायरसचे चार प्रकार पडतात. A, B, C आणि D.H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरस टाईप A चा सब व्हेरिएंट आहे. हा विषाणू पक्षांपासून प्रत्येक श्वास घेणाऱ्या जीवाला बाधित करु शकतो.

तज्ज्ञांच्या मतानुसार हा व्हायरस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये पसरु शकतो. याबरोबर गंभीर आजारी, स्मोकर्स, शुगर पेशंट, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांना जास्त धोकेदायक आहे. या लोकांसाठी H3N2 व्हायरस धोकेदायक ठरु शकतो.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

हा व्हायरस थेट नाक, गळा यावर अटॅक करतो. सर्दीत ताप, नाकातून पाणी येणे, अंगदुखी, खोकला ही याची प्रमुख लक्षणं आहेत. दिल्लीमध्ये या व्हायरने डोकेदुखी वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT