Haldwani Banbhoolpura Violence Mastermind Abdul Malik Arrested 
देश

Haldwani Violence Mastermind Arrested : हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

Haldwani Banbhoolpura Violence Mastermind Abdul Malik Arrested : उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यातीन बनभूलपुरा येथे ८ फेब्रुवारी रोजी हिंसाचाराची घटना घडली होती.

रोहित कणसे

Haldwani Banbhoolpura Violence Mastermind Abdul Malik Arrested : उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यातीन बनभूलपुरा येथे ८ फेब्रुवारी रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या हिसाचाराचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. उत्तराखंड पोलिसांचे प्रवक्ते आयजी निलेश भारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी या हिंसाचारानंतर फरार होता आणि त्याचा शोध पोलिसांच्या अनेक पथकांकडून घेणे सुरू होते. पोलिसांनी आरोपीविरोधात लुकआऊट नोटीस देखील जारी केली होती.

विशेष म्हणजे आरोपी अब्दुल मलिक याने हल्दवानीच्या सेशन कोर्टात अंतरीम जामीनासाठी याचिका देखील दाखल केलेली आहे, यावर २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वीच दिल्ली पोलीसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केला आहे. आरोपीच्या वकीलांनी सांगितलं की त्यांना माहिती मिळाली की अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक केली आहे, मलिक याचा हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. जेव्हा हा हिंसाचार झाला त्याच्या तीन-चार दिवसांआधीपासून तो हल्दवानीत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT