Haldwani Violence esakal
देश

Haldwani Violence : आईला म्हणाला होता, तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येईन..; जॉबसाठी बिहारमधून हलद्वानीला गेलेल्या तरुणासोबत घडली दुर्दैवी घटना

उत्तराखंडच्या हलद्वानी येथे बेकायदेशीररित्या उभारलेला मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार उसळला होता. बनभूलपुरा भागातील मलिक बागेजवळील बेकायदा मदरसा पाडल्यानंतर ही घटना घडली.

संतोष कानडे

नवी दिल्लीः उत्तराखंडच्या हलद्वानी येथे बेकायदेशीररित्या उभारलेला मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार उसळला होता. बनभूलपुरा भागातील मलिक बागेजवळील बेकायदा मदरसा पाडल्यानंतर ही घटना घडली.

हिंसाचाराच्या घटनेमुळे बनभुलपुरा भागातील लष्कर छावणी, तिकोनिया-तीनपानी आणि गौलापार बाह्यवळण भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. बिहारचा एक युवक नोकरीच्या शोधात उत्तराखंडच्या हलद्वानी येथे गेला होता. मात्र तेथे झालेल्या हिंसाचारात त्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या नोकरीची बातमी ऐकण्यापूर्वीच कुटुंबाला त्याचा मृ्त्याची बातमी ऐकावी लागली आहे. त्यानंतर त्याचं कुटुंब नैनीताल येथे पोहोचलं. बनभूलपुरा येथील रेल्वे स्टेशनवर तरुणाचा मृतदेह आढळल्याचं कुटुंबांचं म्हणणं आहे. त्याच्या डोक्याला अनेक गोळ्या लागल्याचंही कुटुंबियांनी सांगितलं.

आराच्या सिन्हा ओपी येथील छिनेगावचे श्यामदेव सिंह यांचा मुलगा प्रकाश कुमार (वय २४) हा नोकरी शोधण्यासाठी उत्तराखंड येथे गेला होता. तेथे झालेल्या हिंसाचाराचा तो शिकार ठरला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मृत प्रकाश कुमार याची बहिणी दिप्ती आणि नरगिस सिंह यांनी सांगितलं की, छोटा भाऊ प्रकाशवरच घराची जबाबदारी होती. बिहारमध्ये तो पाच वर्षांपासून नोकरी शोधत होता. त्यातच त्याला कुणीतरी नैनीतालमध्ये नोकरी मिळेल, असं सांगितलं. त्यावरुन त्याने ६ फेब्रुवारी रोजी नैनीताल येथे जात नोकरी शोधण्याचं काम सुरु गेलं.

८ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता प्रकाशचं कुटुंबियांशी शेवटचं बोलणं झालं. त्याने त्याचा छोटा भाऊ आकाश उर्फ अभिराजसोबत बातचित केली होती. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. १० फेब्रुवारी रोजी दुपारी हलद्वानी पोलिसांनी कुटुंबियांना फोन करुन त्याच्या मृत्यूची माहिती दिली.

प्रकाशच्या बहिणीने या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. माझा भाऊ दहशतवादी नव्हता. त्याला गोळी मारली गेली. जर त्याला बिहारमध्येच नोकरी लागली असती तर तो उत्तराखंडमध्ये गेलाच नसता, असा आरोप केला आहे.

मृत प्रकाशच्या आईने सांगितलं की, पाच मुली झाल्यानंतर प्रकाशचा जन्म झाला होता. केवळ कुटुंबच नाही तर संपूर्ण गावातले लोक त्याला मान देत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नोकरीचा शोध सुरु केला होता. जेव्हा तो नोकरीच्या शोधासाठी जात होता तेव्हा त्याने माझ्यासह सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन येणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्याच्या मृत्यूची खबर आम्हाला मिळाली. असं म्हणत प्रकाशच्या आईने टाहो फोडला.

दरम्यान, हलद्वानी हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये 16 जणांची नावे आहेत, तर 5000 लोक अज्ञात आहेत. आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर सुमारे 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे ते हिंसाचाराच्या ठिकाणी होते की नाही याचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT