hamal coolie 
देश

हमाल करी कमाल! UPSC मध्ये मारली बाजी

सकाळ डिजिटल टीम

केरळमधील(Keral) मुन्नार (Munnar) जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले श्रीनाथ के(Srinath K). एर्नाकुलम (Ernakulam) येथील रेल्वे स्थानकात हमाल म्हणून काम करत होते. 2018 मध्येच त्याने स्पर्धा परीक्षेचा (civil exams) अभ्यास सुरू केला. कठोर परिश्रम आणि निष्ठेमुळे त्यांनी केरळ लोकसेवा आयोग (KPSC) ची परीक्षा उत्तीर्ण केली. अथक प्रयत्नांनंतर, अखेर त्यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली, असे न्यूज 18 ने वृत्त दिले आहे. (Hamal Srinath K passed UPSC studied at the train station using free WiFi in Kerala)

वडील म्हणून कर्तव्य पूर्ण करण्यासाठी घेतला निर्णय

तासनतास मेहनत करूनही श्रीनाथ यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या एक वर्षाच्या मुलीला त्रास होऊ नये असे त्यांना वाटत होते. अधिक पैसे कमावण्यासाठी त्यांनी डबल शिफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली, पण तरीही दिवसाला फक्त 400-500 रुपये मिळत होते. अखेर त्याने ही परिस्थिती बदलण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

प्रेरणादायी प्रवास

श्रीनाथ के. हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावणारे आहेत. आवश्यक शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर ते अधिकृत कुली बनले होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक साहित्य नव्हते. पण त्याने हार मानली नाही. परीक्षेची ऑनलाइन तयारी करण्यासाठी त्याने आपला स्मार्टफोन आणि रेल्वे स्टेशनवरील मोफत वाय-फायचा वापर केला. कोणतेही क्लासेस जॉईन न करता, त्याने KPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तो इथेच थांबला नाही आणि त्याने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या तीन प्रयत्नामध्ये तो अपयशी झाला तरी त्याने प्रयत्नक करणे सोडले नाही. अखेर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने UPSC परीक्षा उतीर्ण झाली.

श्रीनाथ यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देत आहे. काही अयशस्वी प्रयत्नांनंतर निराश झालेल्या, संसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःची स्वप्ने यामध्ये अडकलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आज IAS श्रीनाथ एक जिवंत प्रेरणा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT