Diesel Home Delivery
Diesel Home Delivery  esakal
देश

आता डिझेल मिळणार घरपोच; 'ही' कंपनी सुरू करणार होम डिलिव्हरी

सकाळ डिजिटल टीम

Home Delivery of Diesel: अलीकडच्या काळात आपल्याला विविध वस्तूंची होम डिलिव्हरी मिळत असते. मोबाईल, शूज, कपडे एवढेच काय खाद्यपदार्थ तसेच औषधंसुद्धा घरपोच मिळतात. परंतु भारतात आता डिझेलची होम डिलिव्हरी मिळणार आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हे खरं आहे. 'हमसफर इंडिया' ही डिझेल होम डिलिव्हरी कंपनी चालू आर्थिक वर्षात भारतातील आणखी 200 शहरांमध्ये आपली सेवा विस्तारित करण्याची योजना आखत आहे. या स्टार्टअप कंपनीने असेही म्हटले आहे की त्यांना ई-मोबाइल वाहन चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायात प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी त्यांची काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.(Hamsafar India company planning to expand home delivery of Diesel service across 200 cities in India soon)

हमसफर इंडियाच्या सह-संस्थापक सान्या गोयल म्हणाल्या, "सध्या आमच्याकडे डोअर स्टेप डिझेल डिलिव्हरीचा 20 टक्के बाजार हिस्सा आहे आणि आम्ही चालू आर्थिक वर्षात 30 टक्के हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहोत. आम्हाला भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचायचे आहे आणि भविष्यात सर्व प्रकारच्या ऊर्जा वितरणात क्रांती घडवायची आहे.

देशभरात घरपोच इंधन वितरणाचं मॉडेल झपाट्याने विस्तारत आहे आणि कोविड नंतरच्या काळात ते आणखी वेगाने वाढले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 30,000 कंटेनरची विक्री झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “आम्ही बाजारपेठेत अधिक विस्तार करण्याचं धोरण आखले आहे आणि चालू वर्षात ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा ठेवली आहे आणि निर्यात करण्याचीही अपेक्षा आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT